सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
।। शेवटचा श्वास ।।
हातात हात घेता
रोखला श्वास माझा
बघती कित्येकजण
साथ असेल तुझा
भीती वाटत नाही
चिंता मुळीच नाही
काळजी कशाची जेव्हा
सोबत तुझी असायची
रोखून बघतात हे डोळे
काही जंगली श्वापदाची
घाबरत नाही मुळीच मी
तुझी सावली असे धैर्याची
तुझ्याविना मी एकटे
असे जगू शकत नाही
शेवटचा श्वास तू माझा
तुझ्याशिवाय मी नाही
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769






Be First to Comment