Press "Enter" to skip to content

उगाचच

उगाचच

उगाचच मिठी सैल होते रात्र सरत जाताना
उगाचच श्वासांची लय संथावते रात्र सरत जाताना

उगाचच शहारे मंदावतात रात्र सरत जाताना
उगाचच विचारांचे आवेग रात्र सरत जाताना

उगाचच वेडेपिसे अश्रू रात्र सरत जाताना
उगाचच डोळेही अघोरी रात्र सरत जाताना

उगाचच तनात काही रात्र सरत जाताना
उगाचच मनात काही रात्र सरत जाताना

उगाचच पुन्हा मिठीत पहाट रात्र सरत जाताना
उगाचच जवळचे दूर रात्र सरत जाताना

उगाचच ओल ओठावर रात्र सरत जाताना
उगाचच व्यथांची अस्वस्थता रात्र सरत जाताना

उगाचच काही खुणा आठवणींच्या रात्र सरत जाताना
आणि उगाचच पुन्हा एक कविता रात्र सरत जाताना दीपक पळसुले, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.