Press "Enter" to skip to content

बळी

बळी

ओंगळ वाईट विकारांना
कळी माझी दिसली
पाशवी समाज नजरांना
आणखी एक बळी पडली

पंधरा दिवस मृत्यूशी
झुंज अपुरी पडली
काळालाच दया तिची
यमलोकी रवानगी झाली

शेवटचाही संस्कार
घाई घाईत उरकला
अंतिम तिचा चेहरा
कधीच नाही दिसला

दाद कोणा मागू आता
म्हणे पुरावा मिळत नाही
जात आडवी येते आता
माणुसकी दिसत नाही

हाथरसची ही घटना
समाज पेटून उठतो
बधिर राजकारण्यांना
स्वतःचा फायदा दिसतो

सौ.स्वाती लेले,
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.