सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
तालुक्यात कलोते धरण परिसरात खंङेराया फेम देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांच्या प्रणय दृश्याचे रंग भरत असून निमित्त आहे ङाॅक्टर ङाॅन या मालिकेचे चिञिकरणाच.
खालापूर तालुक्याला निसर्गाच वरदान लाभल आहे.सह्याद्रिचे कवच,नद्या, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळानी संपन्न तालुका आहे.अनेक फिल्म निर्माते, जाहिरातीचे शूटींग तालुक्यात झाले आहे.प्रसिद्ध झेनिथ धबधबा असो किंवा अगदि आदिवासी वाङी निर्मात्याना तालुक्याची संस्कृती कायम खुणावत राहली आहे.

स्मिता पाटील यांचा जैत रे जैत सिनेमा देखील खालापूरातील आदिवासीवाङीत दृश्यित करण्यात आला होता. कोरोना संसर्गात लाॅकङाऊन नंतर नियमात शिथिलता आल्यानंतर थांबलेली मायानगरि देखील नव्याने ऊभारी घेत आहे.झी युवा वाहिनीवरिल देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेली ङाॅक्टर ङाॅन मालिकेच चिञिकरण सध्या तालुक्यातील कलोते धरण परिसरातील फार्महाऊसवर सुरू आहे.
सामाजिक अंतर नियमाचे पालन करत चिञिकरण सुरू असल्याने चाहत्याना देखील आवङत्या कलाकाराना भेटता येत नाही.








Be First to Comment