Press "Enter" to skip to content

वाचा नंदकुमार मरवडे यांचा विशेष लेख :
मोबाईलचा अतिरेक घातकच


सिटीबेल लाइव्ह /वाचनकट्टा

मोबाईलचा अतिरेक घातकच

आजच्या युगातील एक चमत्कारिक अविष्कार म्हणजे मोबाईल.मोबाईलमुळे सारे जग जवळ आले आहे.सर्वच प्रकारची माहिती एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळत असल्याने मोबाईल वापरणा-यांचे प्रमाणही जगभरात लक्षणीय आहे.
काँम्प्युटर,घड्याळ,कँलक्युलेटर आदी साधनांची जागाही आता मोबाईलनेच घेतली आहे. आज आपण मोबाईलवरून बँका, विमा,विजबिल भरणा,गाड्यांचे आरक्षण आदी व्यवहारही आपण घरबसल्या करीत आहोत. आँनलाईन माहिती पाठविणे किंवा मागविणे हेही मोबाईलद्वारे अगदी सहजसाध्य घरबसल्या करीत असल्याने मोबाईलचा वापर सहज शक्य झाला आहे.अशाप्रकारे मोबाईलचे अनेक फायदे आहेत. ही झाली एक बाजू.परंतू मोबाईलचा अतिरेक मात्र घातकच ठरत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तर कधी कधी जिवघेणाही ठरत आला आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी चातकच ठरत असतो.मग मोबाईलही त्याला अपवाद नाही.आज मोबाईलचे जसे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत.मोबाईलवर बोलताना आपण कोणाशी किती वेळ बोलतोय यालाही मर्यादा आहेत. परंतू काही माणसे मात्र तासनतास मोबाईलवर बोलत असतात.त्यामुळे वेळेचा अतिरेक होतोय याचेही भान नसते.तर कधी कधी जास्त बोलण्याने मोबाईलची बँटरीही गरम होते.तर अति बोलण्याचा ताणही शरीर व मनावर येत असल्याने त्याचा नकळत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.मोबाईलवरील व्हाटसअँप या अँपद्वारे तासनतास चटींग केली जाते.यावेही आपल्याला वेळेचे भान नसते.तर कधी कधी व्हाटसअँप द्वारे आक्षेपार्य मजकूर पाठविल्याने वादविवादाचे प्रसंगही घडत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात.तिच अवस्था फेसबुकची.
मोबाईलमधील सेल्फी फंक्शन खरोखरच मजेशीर व आनंददायी.परंतू सेल्फीचा अतिरेक किंवा अनैसर्गिक पद्धतीने केलेला वापरही जीवघेणा ठरत आहे.काहीवेळा सेल्फी घेताना चालत्या ट्रेनमधून,बसमधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सेल्फी घेणे,बाईक चालविताना स्टंटबाजी करुन सेल्फी घेणे,एखाद्या उंच डोंगर पर्वतावर जाऊन जिवघेणी सेल्फी घेणे किंवा पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत सेल्फी घेणे आदी स्टंटबाजीचे सेल्फीचे प्रकार हमखास जीवघेणे ठरत आहेत.अशाप्रकारे सेल्फीच्या माध्यमातून वारंवार अशा दुर्देवी घटना घडत असताना कोणीही त्यापासून बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे.
मोबाईलचा वापर करताना तो आपण कितीवेळ आणि कसा करतोय यावरही ब-याच हानीकारक गोष्टी अवलंबून असतात.लहान मुले तासनतास मोबाईलवर विविध गेम्स खेळत असतात.सतत नजर मोबाईलवर लावल्याने लहान वयातच चष्मा लागणे,मानेचे तसेच कंबरेचे विकार घडणे तसेच लहान वयातच मेंदूवर अतिरिक्त ताण पडल्याने मुलं स्वत:चीच शुद्ध हरपतात आदी दुष्परिणाम बालवयातच घडून येतात.तिच अवस्था मोठ्या मुलांची व्हाटसअँपवर तासनतास चटींग करणे,विविध गेम्स खेळणे यामुळे मोठी मुलेही अशा प्रकारच्या आजारांची शिकार बनतात.तर पब्जी सारख्या गेम्समुळे झोपेतच बडबड करणे किंवा मनोरूग्ण होईपर्यंत अवस्धा निर्माण होते.मोबाईल ही गरजेपुरती वारण्याची वस्तू असून शेवटी अतिरेक हा घातकच ठरत आहे.

श्री.नंदकुमार मरवडे,
श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी,
ता.रोहा,जि.रायगड.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.