Press "Enter" to skip to content

माझे शब्द

माझे शब्द

तू नाही अन् मी नाही

कुठे होतो आपण !

तिथे फक्त शब्दच होते.

शब्दांनीच ऐकले शब्द

शब्दांनीच ऐकविले शब्द

शब्दांतून व्यक्त झालेली मनं

अन्

शब्दांनीच शब्दांवर

व्यक्त केलेला विश्वास.

शब्द माझे तुझ्यासाठी,

शब्द शोधीत होते

आणि….

शब्दांमधून शब्द

व्यक्त होत होते.

शब्दांसाठीच सारं काही

शब्दांमधून मांडलेलं,

शब्दांच्याही पलीकडलं.

विश्वासपूर्ण शब्दांना,

शब्दांनीच

दाखविलेली…

विश्वासाची वाट होती.

हातात हात नाही

पण…

आधाराची शब्दसाथ होती

शब्द माझे तुझ्या

शब्दांवर रूसले

तुझ्या शब्दांनीच

शब्दांना आळविले

आणि…

शब्दच शब्दांत

विरघळले…

संगीता थोरात, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.