बेरीज -वजाबाकी
आयुष्य म्हणजे बेरीज वजाबाकीचा खेळ
विचार करकरुन डोक्याचा होतो भूगा
पण हिशोबाचा लागत नाही मेळ!
बेरीज वजाबाकीचा व्यवहार जगून
माणसं होतात मूकी
पण दुसर्याकडे पहा म्हणजे
वाटेल आपण किती सुखी!
कितीही सुख मिळालं तरी
सवय असते रडायची
सगळं पटतं पण
सवय होत नाही हसण्याची!
माझ्या मनात विचार ठरलाय पक्का
जर चालविला बेरीज वजाबाकीचा हेका
तर सद्गुरु चरणी घालून भार
नामस्मरणानी देइन त्याला धक्का!
प्रत्येकाचा विचार वेगळा
प्रत्येकाचा वेगळा मार्ग
आपापल्या विचाराने
वजाबाकीला द्या अर्ध्य!!!
प्रतिभा शेवडे, दादर, मुंबई







Be First to Comment