तशीच रात्र साजिरी….
तसाच मी तशीच तू तशीच रात्र साजिरी
तसाच धुंद गारवा तशीच वेळ लाजरी…
तसेच चूर लाजणे, तसेच मंद हासणे
तशीच तू हि मज समीप स्वप्नधुंद बावरी…
तसेच स्पर्श कोवळे, तसेच रंग सोहळे
तसेच लख्ख चांदणे, तशीच गंध माधुरी…
तसेच उष्ण श्वास अन तसेच बाहुपाश ही
तसाच मी तशीच तू तशीच रात्र साजिरी….
अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment