Press "Enter" to skip to content

लॉकडाऊन मनोगत.

लॉकडाऊन मनोगत.

सुरुवातीचे दिवस बरे गेले,
रोज नविन पदार्थ करून भरपूर खाल्ले.
मग काय वाढले वजन,
छातीत झाले एकदम धसकन, शुगर,बीपी ची वाटली भिती,
आता व्यायाम करु
कोणते आणि किती.

विरंगुळा म्हणून हाती घेतला मोबाईल,सोडवली कोडी, नातेवाईक आणि मैत्रीणींशी चॅटिंग केले भरपूर,
पण डोळ्यांची वाढली कूर कूर,
मोबाईल चा ही आला कंटाळा, दिवस वाटे मोकळा, मोकळा.

बसले शांत आणि ध्यानमग्न,आठवली संतांची वचने
“मन करा रे प्रसन्न”
“ठेवीले अनंते तैसेचि रहावे”
मनापासून वाटले‌ श्रीदासबोध, श्रीज्ञानेश्वरी यांचे पारायण करावे
आलेल्या संकटाला धीराने तोंड द्यावे.
पण तरीही कधी कधी वाटते केंव्हा जाईल हा व्हायरस,
आणि कधी येतील ते पुर्वीचे आनंदी दिवस…….?

शुभांगी कुलकर्णी, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.