Press "Enter" to skip to content

कामचुकार कामगार व नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जेएनपीटी खासगीकरणाची टांगती तलवार


सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔷🔶🔶🔷

जेएनपीटी बदर सुरू झाल्यापासून काही कामगारांचा कामचुकारपणा व कामगार नेत्यांचे दुर्लक्षपणामुळे खासगीकरणाची टांगती तलवार असल्याची माहिती काही कामगारांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. जेएनपीटी बंदर सुरू झाल्यानंतर कामगार वर्गातील ठराविक कामगारांचीच मक्तेदारी वाढत ते कामावर हजेरी लावून नेहमीच घरी परतत असत. तसेच यातील अनेक कामगार हे स्वतः ठेकेदार व कामगार नेते आहेत.

या सर्वांचा विपरीत परिणाम बंदराच्या उत्पादन क्षमतेवर होऊ लागला. त्यामुळेच जेएनपीटी खासगीकरणाचा डाव गेली अनेक वर्षांपासून सरू आहे. त्याची माहिती काही कामगारांना व त्यांच्या नेत्यांना आधीच माहिती होती. परंतु त्यावेळी कोणी बोलण्यास तयार नसल्याचे कामगारवर्गात बोलले जाते.
जेएनपीटी नंतर जीटीआय, डीपी वर्ल्ड, सिंगापूर बंदर हे सुरू झाले आहेत. ही बंदरे सुरू होण्याआधी कोणीही कामगार नेत्या त्यावेळी ही बंदरेही जेएनपीटी प्रमाणे शासकीय पध्दतीने सुरू करावीत यासाठी प्रयत्न किंवा विरोध केला नाही. त्यामुळे ही बंदरे खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू झाली.

त्यामध्ये स्थानिकांची भरती न पेक्षा परप्रांतीयांची भरती मोठ्या
प्रमाणात झाली आहे. त्यावेळेपासून अशा गोष्टींना विरोध झाला असता तर आज ही वेळ आली नसती.
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे वारे वाहू लागताच कामगार संघटनाकडून याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. जेएनपीटीने दास्तान फाट्याजवळ जे करोडो रुपये खर्च करून स्मारक उभारले आहे. हे स्मारक पहिल्याच पावसात त्याला गळती लागल्याचे समजते तशाप्रकारचे वृत्त अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत विश्‍वस्त अथवा कोणतीही कामगार संघटना आवाज उठवताना दिसत नाही.

यामुळे उरण परिसरात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
केंद्र सरकारने इतर कंपन्या बरोबर जेएनपीटीचेही खासगीकरणाचा निर्णय घेऊन हे काम अंतिम टप्प्यावर आल्याचे समजते. येत्या हिवाळी अधिवेशनात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. आमच्यातील काही कामगारांचा कामचुकारपणा करून हजेरी लावून घरी परतणे, तर काहीजण ठेकेदार बनले तसेच आमच्या कामगार नेत्यांचाही दुर्लक्षितपणाच जेएनपीटी खासगीकरणास कारणीभूत असल्याची माहिती काही कामगार नेत्यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.