🌹 अबोल प्रिती 🌹
का रे असा रुसलास मोहना
व्याकूळ जीव पाणी लोचना
मनीची प्रीत समजून घे ना जरा
मुरलीधर नकोस जाऊ पैलतीरा
ओढ मनी तुझ्या भेटीची,
प्रीतीची
थांबना पळभर आस अंतरीची
पावा मंजुळ गुंजत आहे वनी
भेटावया तुज अधीर मी मनी
दर्शना देरे आता कृष्ण मुरारी
भेटण्या तुज राधा ही बावरी
सुखदा तारे, खांदा कॉलनी







Be First to Comment