आॅनलाईन अध्यापन
आॅनलाईन शिकवायचंय
हे मला कळले जेव्हा…
जमेल का हे आपल्याला
घाम फुटला होता तेव्हा…
काय करावे ? कसे करावे ?
कोणत्या प्रकारे शिकवावे ?
सवय होती इतक्या वर्षांची
वर्गात मुलांपुढे शिकवण्याची।
प्रश्न होते खूप मनात, पण…
बदल होणारच ना जीवनात !
आव्हान पेलण्याचे ठरवले
होईल सर्व नीट मनाने ऐकवले
प्रसंग जरी आला बाका
तरी सहकार्यांना मारू हाका।
सगळे करतील नक्की मदत
होता पक्का विश्वास मनात।
शेवटी वाटले तसेच झाले
अनेक जण मदतीला आले।
जिद्दीने शिकवणे सुरू केले
आणि आॅनलाईन सोपे झाले।
शुभांगी क्षीरसागर,
नवीन पनवेल.







Be First to Comment