🔷🔶 कीर्ती असावी तुझी त्रैलोकी 🔶🔷
जन्म मिळाला तुला पूर्वपुण्याइन
कर कर्म असे होईल जन्माचे सोन
एक एक पाऊल उचल सच्चाइन
कीर्ती असावी तुझी त्रैलोकी ……
पैश्या पेक्षा कीर्ती आहे श्रेष्ठ
अवगुण दूर कर लवकर घे कष्ट
तुझा नावलौकिक व्हाचा इष्ट
कीर्ती असावी तुझी त्रैलोकी ….
देह झिजवी सत्कर्म योगे
दिन दिन जवळ करी दोघे
आपुल्या जन्माचे पावित्र्य
कीर्ती असावी तुझी त्रैलोकी …
अस्तित्व जाणून घे तुझे
लोक म्हणतील तुजला
आणिक नको मागू मागणे
कीर्ती असावी तुझी त्रैलोकी ….
कर्माची रीत न्यारी गुणगान गाती
दुनिया तुझी तंव चरणी ठेवी
अस काही तरी कर राहावी कीर्ती
कीर्ती असावी तुझी त्रैलोकी ……
कवी
निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासेस आवरे
9221345869






Be First to Comment