एक असा कावळा..
कावळा असे काळा काळा
दहिभाताचा तो भूकेला
काव काव करुनी सांगतो
पाहुणा येईल दूर गेलेला ||१||
पक्षी तोही इतरांसारखा
मुक्ती साठी तोच एकला
पिंडाला तो स्पर्श करुनी
देतो शांती मृत शरीराला ||२||
पुराणातल्या परंपरेला
कावळा लागे पिंडाला
घरट्यासाठी वणवण भटके
नाही थारा त्याच्या जीवाला ||३||
गोष्टीमधला कावळा भासे
हुशार आणि पुढारलेला
शक्ती पेक्षा युक्ती हवी
संदेश देतो सा-या जनतेला ||४||
अनेक रुपे अशी याची
पण गरजेपुरता स्मरलेला
डोमकावळा म्हणूनी नेहमी
प्रत्येक वेळी हिणावलेला ||५||
सुजाता कुलकर्णी, आदई






Be First to Comment