हे काय घडले
२०२० वर्ष हे आले
काय काय स्वप्न हे पहिलेले
चायना मधे कोणि वटवागुळ काय खाल्ले
आणि कहितारी विपरितच घडले !
लॉकडाउन वर लॉकडाउन
बजावले,
सर्वच घरी अडकले
आयुष्यातल्या गतीला शमविले
शाळा आता घरातच भरली
आई स्वयंपाक घरातच अडकली
ऑफ़िस घरा मधेच थाटले
कहितारी अजबच घडले !
बाजारातला रवा, मैदा संपला
ब्रेड, केक पण घरीच बनवला
विविध पदार्थ घरीच चाखले
कारण होटेलाना होते टाळे
कहितारी अजबच घडले !
काही डॉक्टरांनी देवाचे रूप धारण केले
अनेकांचे प्राण वाचविले
नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिस पण मागे नाही राहिले
प्राण पणाला लाविले
काय म्हणु हे काय घडले !
त्यातच चायनाने डाव टाकला
सारा देशच खवळला
देशभक्तिचे वारे वाहू लागले
आत्मनिर्भर होण्याचे ठरविले
काय म्हणू हे काय घडले ?
अश्यातच बप्पा पण आला
अनोखा सण साजरा झाला
सर्व मित्र परिवार ऑनलाइन भेटले
काय म्हणू हे काय घडले !
मास्क कधी सुटणार ?
मुलांना हुंदडायला कधी मिळणार ?
लस कधी येणार ?
कर्ता करविताच हे ठरविणार
ह्याच कडे डोळे लागले
आता जे घडले ते घडले !
जे घडले ते घडले !
डॉ. शिल्पा सप्रे-गोडबोले,
नवीन पनवेल






Be First to Comment