Press "Enter" to skip to content

   गौरी महालक्ष्मी

   गौरी महालक्ष्मी

  गौरी  महालक्ष्मी आज आलिया घरा 
आनंद वर्णाया मज शब्द नसे दुसरा

अंगणात शिंपण केले पारिजातकाचे
दारास बांधिले तोरण झेंडू ,आम्रपर्णाचे

गृहलक्ष्मी ती नटली, सजली वस्रालंकाराने
करिती पंचपक्वाने , नेवैद्य मिळूनी हौशीने

सख्यांना तोषविती ,फराळ तीर्थ प्रसादाने
सख्यांसोबत फुगडी , फेर धरीती आनंदाने

गोड गाणी , घागरी फुंकुंन करिती जागर
सन्मान गौराई जेष्ठा – कनिष्ठा महालक्ष्मी समोर

हर्षाभराने गौरीपूजन
गणेशोत्सव
महाराष्ट्रातील हा प्रमुख सण -उत्सव..||

  वर्षा मेहेंदर्गे ‌, नवीन पनवेल
   

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.