पंचाक्षरी गणेशवंदना
गणाधिपती
गुणाधिपती
बुद्धिच्या देवा
विद्याधिपती.
दुर्वांची जुडी
लाल जास्वंद
अर्पिता तुज
होई आनंद.
विशाल कर्ण
तीक्ष्ण नजर
रुळते सोंड
उदरावर.
रुप देखणे
चित्त प्रसन्न
कार्या आरंभी
तुझे पूजन.
बैसून येशी
मूषकावर
तिन्ही लोकांत
तुझा संचार.
लाडू मोदक
नैवेद्य खावा
सदाचाराचा
आशिष द्यावा.
कृपाकटाक्ष
सदा रहावा
भक्तीचा भाव
तू स्वीकारावा.
अपर्णा साठे, नवीन पनवेल






Be First to Comment