सिटी बेल लाईव्ह काव्य कट्टा 🔷🔶🔷🔶
गणपती बाप्पा ✳️💠✳️💠
गौरीचा पुत्र तू
कैलासावर घर तुझे
वडील तुझे सांब-सदाशिव
मुषक तुझे वाहन असे..,
वैशाख ज्येष्ठ आषाढ सरले
श्रावणा मागून भाद्रपद आले
कोरोनाचे संकट निवारण्या
गणपती बाप्पा धरणीवर आले…
यात्रा नाही-पालखी नाही
नुसता कोरोनाचा कहर
दिंडी-वारी अशीच गेली
कुठं कशात नव्हता बहर…
काम-धंदे बंद झाले
आली बघ उपासमारी
जगावरती आले संकट
घालव देवा महामारी..,
भजन कीर्तन बंद झाले
देवळे झाली सूनसान
दुःख आमचे कुणा सांगू
मात्र तू तरी जाण…
आशा आहे थांबवशील
कोरोनाचा हाहाकार
तुझ्या आगमनाने देवा
होऊ दे चमत्कार
चूक आमची मान्य करून
मनोभावे जोडतो हात
तुझ्या चरणी नवस करतो
कोरोनावर कर मात…
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४







Be First to Comment