Press "Enter" to skip to content

हरितालिका

हरितालिका

पार्वतीने केले जे व्रत कठोर
वृक्षपल्लवी सेवुनी चौसष्ट वर्षं
हिमालय पित्यासी पडला घोर
जावई शोधावा जो असेल थोर||१||

विष्णुला पार्वती देई नकार
महादेवासी वरिले अपार
केला उपवास गुहेत बैसुनी
शिवलिंग पुजिले जागरूनी||२||

प्रसन्न जाहला महेश्वर
हिमकन्येचा पुरविला वर
जाहला विवाह सुमुहुर्ती
कठोर व्रताची ही प्रचिती||३||

भाद्रपद शुद्ध तृतीयेचे दिनी
हरितालिका व्रत जे आचरती
षोडशोपचारे उमा शंकर पुजिती
त्यां मिळे सौभाग्याची वृद्धी||४||

ललना आचरिती कडक निर्जळी
जागरणात पिंगा झिम्मा फुगडी
व्रत होता सुफळ संपूर्ण
दैन्य दु:ख दारिद्रय होई दूर||५||

स्वाती लेले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.