“दैवत माझे”
स्वामी समर्थ दैवत माझे।
त्यांच्या सम कोणी न दुजे।।
रूप मनोहर सुंदर निर्मळ।
जशी आपली आई प्रेमळ।।
भक्तांच्या हाकेला धावी।
अनुभवाची प्रचिती दावी।।
कलीयुगातही लगेच पावी।
लेकरांच्या इच्छा पुरवी।।
स्वामी माझे भक्ताभिमानी।
आश्वासक असे त्यांची वाणी ।।
डोळ्यात भाव अमृतावाणी।
नतमस्तक मी स्वामी चरणी।।
कलियुगी या भाग्य लाभले।
स्वामींचे कृपाछत्र मिळाले।।
योगीयांचे असे योगिराजे।
स्वामी समर्थ दैवत माझे।।
कवी निलेश केरकर
डोंबिवली पूर्व






Be First to Comment