Press "Enter" to skip to content

रामशेठ ठाकूर यांचे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

पनवेल तालुका पत्रकार मंचाने सन्मान केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे : लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर

  • नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिका तसेच रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दैदिप्यमान यश प्राप्त केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या धोरणी आणि सर्वसमावेशक राजकारणामुळे भारतीय जनता पार्टीचा सर्वत्र डंका वाजत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे करत असलेल्या लोकाभिमुख समाजकारणाला जनता जनार्दनाने दिलेली ही एक प्रकारे सर्वमान्यता आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून त्यांचा सन्मान केला.
  • पनवेल महानगरपालिकेची दुसरी निवडणूक नुकतीच पार पडली. ७८ नगरसेवकांपैकी ६० नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. अत्यंत सजग व प्रामाणिक कार्यप्रणाली असणारे नितीन भाई पाटील हे महापौर पदी विराजमान झालेले आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील आठ पैकी आठही मतदारसंघांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. पनवेल पंचायत समिती मधील १६ मतदारसंघांपैकी १५ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती विजय संपादित केला. या दैदीप्यमान यशाचे श्रेय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनाच जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुशल नेतृत्वाखाली सारे डावपेच आखले गेले होते. एखाद्या कसलेल्या राजकीय धुरंधराप्रमाणे त्यांनी टाकलेल्या डावपेचात महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण उडाली. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने त्यांच्या याच कर्तृत्वाबद्दल त्यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
  • या सन्मानाला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की माझ्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढवल्या आणि जिंकल्या असे असले तरी देखील जनता जनार्दनाने आम्ही केलेल्या पाच वर्षाच्या विकास कामांकडे पाहून आम्हाला विजयी केलेले आहे. आम्ही सातत्याने सकारात्मक आणि जनता केंद्रित राजकारण करत आलो आहोत. लोकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करून त्यांना सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याकडे आमच्या कार्यकर्त्यांचा कल असतो. सर्व नवनिर्वाचित याच भूमिकेतून काम करतील याची मला खात्री आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने मला सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या सत्कार सोहळ्याला माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, खजिनदार दत्ता कुलकर्णी, सरचिटणीस हरेश साठे, सदस्य राजू गाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.