
शासनाच्या महाराजस्व अभियानाचा नागरीकांनी लाभ घ्यावा : तहसीलदार तानाजी शेजाळ यांचे आवाहन
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने “महाराजस्व अभियान” सुरू केले असून या अभियानामध्ये महसूल विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून महसूलचे सर्व दाखले आपल्या गावातच मिळणार असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पेण तहसीलदार तानाजी शेजारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे.सदरचे अभियान ७ मार्च ते ८ मे २०२६ या दरम्यान मंडळ स्तरावर आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.दिनांक ७ मार्च रोजी तालुक्यातील कासू, १४ मार्च कामार्ली, १० एप्रिल वडखळ, १७ एप्रिल हमरापूर दत्त मंदिर जोहे, ८ मे पेण शहर आणि १५ मे वाशी या गावांमध्ये सर्व मंडळ, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रात ६ विशेष अभियानात आयोजित करण्यात आले असून यात सर्व सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विदयार्थी, महिलांसाठी महसूल विभागामार्फत १५ सेवा देण्यात येणार आहेत.शहरी व ग्रामपातळीवरील विद्यार्थी व जनतेने लाभ घ्यावा असे अहवान तहसीलदार यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांना विविध सेवांचा लाभ मिळेल त्यात
प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ शासन निर्णय, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, भोगवटदार वर्ग-२ चा वर्ग-१ करणे, ८ अ चे वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा (४२-४७कलम), संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजनांचा यात समावेश आहे.




Be First to Comment