युद्ध
वर्षा आणि वायु यांनी युद्ध मांडले
श्रेष्ठत्वाची लढाई जणू ते लढू लागले
वर्षांने प्रथम दाखविला आपला प्रताप
थरथरली अवनी पाहूनी आकाशाचा विलाप
वायूला ही जोर चढला वाहे तो सुसाट
वृक्ष वेली नतमस्तक होती पाहुनी रूप विराट
नदी-नाले तलाव पोहोचले आता घरात
तारांबळ उडुणी निघाले सर्व आसरा शोधीत
वायूही आता हट्टाला पेटला
उडवी छप्परे, झोपड्या, दरडी ही पाडल्या
वर्षा चिडवे वायूला आणुनी प्रलय
वायु ने पळवूनी मेघांना तोडली तिची रसद
तुंबळ युद्धा मध्ये दोघे करती वार प्रति वार
शेष टाकू पाहे सकल पृथ्वीचा भार
उभा ठाकला कृष्णसखा घेऊन गोवर्धन
शांत झाले वर्षा आणि वायु घेऊन राम नाम
धनंजय देशमुख, नवीन पनवेल






Be First to Comment