Press "Enter" to skip to content

लाभार्थी शेतकऱ्यांना निधी घर बसल्या : डाक विभागाची योजना

सिटी बेल लाइव्ह / उरण (बातमीदार):

जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत डाक विभाग पोहचलेला आहे. या सर्वदूर जाळ्याचा उपयोग बँक सेवा पुरविण्याचा भारत सरकारचा मानस असून त्या दृष्टीने डाक विभाग नव्या रूपात समोर आलेला आहे .इंडीया पोष्ट बँकेमुळे गावातील पोष्टमन ही एक चालती फिरती बँक असून घरपोच बँकींग सेवा देणे त्यामुळे डाक विभागास शक्य झाले आहे.

केंद्र शासन तसेच राज्य शासन विविध योजनांचे अनुदान डायरेक्ट बेनिफीट ट्रान्फर (DBT) च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधे जमा करत असते. शेतक-यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नुकतेच देशभरातील 8.5 कोटी शेतक-यांच्या खात्यामधे प्रत्येकी रूपये दोन हजार केंद्र शासना मार्फत जमा करण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई डाक विभागाच्या अंतर्गत येणा-या पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, तालूक्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा निधी घर बसल्या अगदी कुठेही न जाता त्यांना मिळावा म्हणून डाक विभाग कटीबद्द आहे

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा त्यासाठी त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिस सोबत संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर नवी मुंबई पनवेल यांनी केले आहे.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.