वीर छत्रपती संभाजी ब्रिगेड चा मास्क बनविणारे व विकणाऱ्यांना इशारा
सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / मुंबई #
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र मास्कचा व्यवसाय तेजीत आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कची जणू स्पर्धाच चालू आहे. रक्षाबंधनला भावा-बहिणीचा, गोकुळअष्टमीला कृष्णाचा असे अलग-अलग मास्क बाजारात उतरले आहेत पण आता तर हद्दच झाली चक्क तिरंगा मास्क बाजारात उतरला आहे.
वीर छत्रपती संभाजी ब्रिगेड चा सर्व हे मास्क बनवणारे व विकणाऱ्याना असे तिरंगा मास्क बनवल्यास सावधानी चा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्यावर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
१५ ऑगस्ट निमित्त बाजारात आलेला हा मास्क. हा मास्क नसुन भारताचा तिरंगा आहे. भारतीयांचा अभिमान आहे.
या तिरंग्यासाठी आज भारताच्या सीमेवर जवान आपला प्राण देतोय .आणि याच तिरंगाचे माक्स बनवून विकले जात आहेत हे दुर्दैव.
तिरंग्याचा हा मास्क तुम्ही खरेदी करणार, एक दिवस घालणार, त्याच्यावर शिंका, थुंकी लागणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फेकून देणार. मी एक भारताचा नागरिक या नात्याने तुम्हाला विनंती करतो की असे मास्क घालून राष्ट्र ध्वजाचा अपमान करू नका आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण घालू देऊ नका…
शिवश्री-संजय सावकार कणसे
संस्थापक /महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष : वीर छत्रपती संभाजी ब्रिगेड













Be First to Comment