सक्सेस फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड़ तर्फे फ्री गणेशा उपक्रमाचे आयोजन
अनामत रक्कम भरून शाडूची गणेश मुर्ती घरी न्या !
घरच्या घरी विसर्जन करून झाल्यानंतर शाडूची माती परत करा आणि आपण भरलेली सर्वच्या सर्व अनामत रक्कम परत घ्या !
सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनिल ठाकूर )
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये ह्यासाठी लोकांनी गर्दी टाळणे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून गणेश विसर्जन देखील घरच्या घरी होणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींपासून पर्यावरणाचे नुकसान होत आहे म्हणून नागरिकांनी शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती वापरावी असे सुचवले आहे.
ह्या दोन्ही विषयांवर तोडगा म्हणून साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रोटरियन रवीशेठ पाटील ह्यांच्या संकल्पनेतून फ्री गणेशा ह्या प्रकल्पावर सध्या काम सुरु आहे. फ्री गणेशा हा उपक्रम सक्सेस फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड ह्यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती स्थापन कराव्यात व विसर्जन हे घरच्या घरी करावे असे आवाहन रवीशेठ पाटील ह्यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
नागरिकांनी रोटरी क्लब ऑफ उलवे नोड च्या कार्यालयाला भेट देऊन आपल्याला हवी ती मूर्ती अनामत रक्कम भरून घरी न्यायची आहे. घरच्या घरी विसर्जन करून झाल्यानंतर शाडूची माती परत करून आपण भरलेली सर्वच्या सर्व अनामत रक्कम परत घ्यायची आहे.
सदर उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे तसेच अधिक माहितीकरिता 9930776206; 9152087767 ह्या क्रमांकावर संपर्क करावा.
Be First to Comment