Press "Enter" to skip to content

आपत्कालीन व्यवस्थापन तज्ञ गुरुनाथ साठीलकर यांनी दिले घोरपडीला जीवनदान

सिटी बेल ∆ खोपोली ∆

अपघाग्रस्तांना मदत करण्यासाठी सदैव तैनात असलेल्या संस्थेचे संस्थापक तथा आपत्कालीन व्यवस्थापन तज्ञ गुरुनाथ साठीलकर यांनी नुकतेच नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या घोरपड या प्राण्याला जीवनदान दिले.
   

अमजद सोंडे या हाळ गावातील दक्ष प्राणी मित्राने कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलेली मोठ्या आकाराची घोरपड सुरक्षित वनक्षेत्रात रिलीज करण्यासाठी गुरुनाथ यांच्याकडे दिली. तत्पूर्वी अमजद याने अत्यंत काळजीपूर्वक घोरपडीची देखभाल केली होती. या प्राण्यास खाणे आणि पाणी देऊन जंगलात सोडण्यात आले.
        

रेपटाईलस् अर्थात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये घोरपड येते. दुर्गम डोंगर कपाऱ्यांच्यात राहणाऱ्या घोरपडीची तिचे मास गुणकारी असल्याच्या अंधश्रद्धेमुळे शिकार करण्यात येते. कित्येकदा बाहेर आलेल्या घोरपडींवर कुत्रे हल्ले चढवून त्यांना ठार करतात. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान करणाऱ्या उंदरांसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये घोरपडी अडकतात व जीव गमावतात. अर्थातच त्यामुळे नामशेष होण्याकडे झुकलेल्या या प्राण्याच्या प्रजातीला जीवनदान दिल्यामुळे अमजद आणि गुरुनाथ साठीलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…

चला पाहुयात घोरपडीचा रेस्क्यू करताना व्हिडिओ….

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.