Press "Enter" to skip to content

करियर मार्गदर्शन शिबिर

दीपक फर्टीलाझर्स व ईशान्य फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी जल शुध्दीकरण प्रकल्प

सिटी बेल ∆ तळोजा ∆

दीपक फर्टिलायझर्स, तळोजा कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशन मार्फत विविध उपक्रम राबवले जात असून यामध्ये प्रामुख्याने उपजीविका विकास, आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास इत्यादी घटकांवर काम  केले जात आहे. जन संघ संचलित नेरे विद्यालय नेरे व वाजे विद्यालय वाजे येथे २५० लिटर प्रति क्षमतेचे जल शुध्दीकरण प्रकल्प बसवण्यात आले आहेत.

सदर जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी श्री प्रदीप जाधव  (वरिष्ठ महाव्यवस्थापक- दीपक फर्टिलायझर्स) व श्री धोत्रे सर (मुख्यादापक नेरे विद्यालय) यांच्या हस्ते पार पडले.  तसेच ईशान्य फाऊंडेशन मार्फत १० वी व १२ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरांची सुरुवात करण्यात आली.

तळोजा विभगतील विद्यालय व कनिष्ठ महािद्यालयामध्ये सदर शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिराचा फायदा  १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार असून सर्व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन बद्दल माहिती असलेली पुस्तके कंपनीकडून देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी  उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व करियर मार्गदर्शन माहिती पुस्तकाचे (पाथ फाइंडर) अनावरण करण्यात आले. श्री योगेश पाटिल (प्रकल्प समन्वयक- ईशान्य फाउंडेशन) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री संदिप आर काकडे (सहाय्यक महाव्यवस्थापक-दीपक   फर्टिलायझर्स)  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री नितीन पाटील (शिक्षक नेरे विद्यालय) व सहयोगी शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.