पनवेलमध्ये विसर्जन घाटावर गर्दी व कोरोना मुक्तीचा संकल्प
सिटी बेल लाइव्ह / पनवेल/ प्रतिनिधी #
गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे, कोरोना संकट पण जैसे थे.. सर्वांना एकत्र करणारा, आनंद निर्माण करणाऱ्या या विघनहर्त्याच्या उत्सवात यंदा बरीच विघ्न आहेत. मुख्य प्रश्न येणारे तो विसर्जनाचा. विसर्जनाला गर्दी करता येणार नाही किंवा सहकुटुंब जाता येणार नाही हे जवळ जवळ स्पष्ट झालं आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी ही गर्दी टाळलीच पाहिजे. पण मग बाप्पाच्या विसर्जनाचं काय! असा प्रश्न अनेकांचा मनात घर करून आहेत. पण काळजी करू नका, ‘तुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू ही अभिनव संकल्पना शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरवासीयां समोर मांडली आहे.
शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबरोबरच गणेशभक्तांच्या श्रद्धेला धक्का लागू नये, विसर्जन घाटावर गर्दी टळून कोरोना विषाणूंचे संक्रमण होवून नये हा या पाठीमागचा उद्देश असल्याचे सोमण यांनी सांगितले.
मार्च महिन्यापासून कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे.कोविड१९ हे संकट अद्यापही नियंत्रणात आलेले नाहीत. या विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून लाॅकडाऊन सुरू आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊन दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या सण उत्सवांवर बंधने आलेली आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बाप्पांचे स्वागत केले जाते. त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी भावपूर्ण निरोप दिला जातो. भव्य मिरवणूक काढून पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष केला जातो. यामध्ये भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. विसर्जन घाटावर गर्दी होते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर केले आहे .
यावर्षी बाप्पा अत्यंत शांततेत येणार आहेत. रोशनाई ,डेकोरेशन, देखावे दिसणार नाहीत . त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक न काढता गर्दी टाळण्याचे सूचित करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व नियम आणि अटींचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे बाप्पांना निरोप द्यायचा कसा विसर्जन कुठे आणि कसे करायचे यासारखे अनेक प्रश्न गणेश भक्तांना पडलेले आहेत. मात्र पनवेल शहरात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना पनवेलकरांसमोर समोर मांडली आहे.तुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू…
हा उपक्रम यंदा त्यांनी हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गणेश भक्तांना आपल्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर जाण्याची गरज नाही. सोमण आणि त्यांचे सहकारी संबंधित ठिकाणी जाऊन बाप्पा घेतील. आणि एकत्रितरीत्या गणेश विसर्जन घाटावर गणरायांना विधीवत निरोप दिला जाईल. त्यासाठी अगोदरच गणेश भक्तांना आणि मंडळांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधितांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला जाईल. त्यावरच सर्व सूचना आणि माहिती दिली जाईल.
बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर केले जातील. जेणेकरून गणरायांचे विसर्जनाचे दर्शन भक्तांना होईल. यामुळे गर्दी होणार नाही, परिणामी कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा धोकाही उद्भवणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी दिली. दीड दिवसांच्या गणपतीपासून या उपक्रमाचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
अअधिक माहितीसाठी 9769108090, 9664848484, 7208224242, 9082107726, 9769515659, 8369116856 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गणेश मंडळ आणि भक्तांनी गणरायाच्या विसर्जनासाठी
https://forms.gle/HCJXysRiyiXTy1HE या लिंक वर नोंदणी करावी. असे आवाहन प्रथमेश सोमण यांनी केले आहे.
Be First to Comment