Press "Enter" to skip to content

पनवेल मध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त “धडकन “कार्यक्रम संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆ भरतकुमार कांबळे ∆

जगभरात साधारणपणे 32%नागरिक हे हृदयविकाराने मृत्यू पावतात ही बाब गंभीर आहे. याचाच विचार करून पनवेल रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ.अनिल परमार यांनी जागतिक हृदय दिन – 29 सप्टेंबर चे औचित्य साधून हृदय रोगाला टाळण्यासाठी. “धडकन” हा उपक्रम माजी गव्हर्नर डॉ गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे.

याचाच एक भाग म्हणून पनवेल मध्ये दिनांक 25सप्टेंबर 2022रोजी वासुदेव बळवंत फडके सभागृहात “धडकन “हा कार्यक्रम घेण्यात आला होता या वेळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ . जगदीश हिरेमठ (रिव्हाईव्ह हार्ट फाउंडेशन – विभागिय समन्वयक) यांनी प्रत्यक्षिकांसाहित मोलाचे मार्गदर्शन केले .यामध्ये हृदयाची काळजी कशी घ्यावी आणि अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावे या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, आम प्रशांत ठाकूर, आम बाळाराम पाटील, माजी महापौर डॉ . सौ कविता चौतमल, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले माणसाचे आयुष हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाच सूत्रिवर अवलंबून आहे, डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटल मधील सुविधा आम्हाला सांगितल्या तर प्रशासन आपल्याला चांगले सहकार्य करेल असेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे प्रेसिडेंट लक्ष्मण पाटील यांनी केले, या वेळी त्यांनी सांगितले रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल नेहमीच सामाजिक बांधिलकी जपते आणि समाजातील घटकासाठी काम करीत असतें.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन , रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर ,रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझोन , आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी विशेष मेहनत घेतली.तसेच डॉ . अविनाश गुठे आणि डॉ . ऋषिकेश ठाकूर यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.