सिटी बेल लाइव्ह / अलीबाग /राजेश बाष्टे #
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मुंबईहून येणाऱ्यांसाठी क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवसांचा असेल. अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याबाबतची नियमावली सर्वांना दिली जाणार आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यात येणाऱ्या एसटी गाड्या लोणेरे, म्हाप्रळ मार्गे येतील, तर जिल्ह्यातील इतर गाड्या कशेडी घाटातून येणार आहेत. प्रत्येक प्रवाशाची माहिती तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य, महसूल आणि पोलीस खात्याच्या संयुक्त पथकापर्यंत पोहोचवली जाईल.
मुंबईहून येणाऱ्या गाड्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणापर्यंत या पथकाकडे पोहोचतील. तेथे प्रत्येक चाकरमान्याची रॅपिड टेस्टिंगद्वारे चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याच्या विलगीकरणाबाबतचा निर्णय वैद्यकीय अधिकार घेतील. महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. मुंबईतून येणाऱ्या या चाकरमान्यांना एसटीची गाडी हाच पास असेल. त्यांना इतर कोणत्याही पासची गरज राहणार नाही.
प्रवाशांचे प्रवासातील खाणेपिणे, स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. गावात पोहोचल्यानंतर नागरी कृती दल आणि ग्राम कृती दलामार्फत त्यांची व्यवस्था केली जाईल. या दलांना येत्या शनिवार-रविवारी मार्गदर्शन केले जाणार आहे.
Be First to Comment