सिटी बेल ∆ बेलापूर ∆
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिवसाचे अवचित्य साधून विद्या उत्कर्ष मंडळाच्या महाविद्यालयात दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी विद्या उत्कर्ष मंडळ संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई येथील पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश लर्निंग सेंटर चे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व कौशल्यात वाढ करण्यासाठी महाविद्यालयाचा हा उपक्रम मुलाचे कामगिरी बजावेल असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी व्यक्त केले तर विद्या उत्कर्ष मंडळ संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी सभापती महादेव मंगल पाटील सर, संस्थेचे सचिव माननीय संदेश पाटील सर संस्थेचे खजिनदार रुपेश दिवेकर सर तसेच सर्व कार्यकारणी सदस्य आणि विद्या प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप तुकाराम दिवेकर सर हे सर्व उपस्थित होते. या
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षक सहसंचालक यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार महाविद्यालयात दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
महाविद्यालयाचे उप -प्राचार्य डॉ. संजय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मुमतुजिन शेख सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्राचार्य डॉक्टर संजय मराठी सरांनी पार पाडली. यावेळी उद्घाटन सर्व प्राध्यापक वर्ग प्रा. सागर साबळे सर , प्रा. वैशाली धमाल मॅडम, प्रा. मनीषा महाजन मॅडम, प्रा. नवीन सर आणि शिक्षकेतर कर्मचारी सुमित कोळी, प्रसाद वाहुळे, व ग्रंथपाल गौतम गायकवाड आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment