हिरवी आस……!!!
बायको बिमार झाली की,
सुकते “घर” नावाचे झाड….!
गळाटून जातात फांद्या
निरस दिसतात पान फुलं अन मुलं..!
निर्जीव होते अंगण
बदलून जाते कळा…
मुका होतो दरवाजा
मुकी होते चिवचिवाट
खाऊ पेक्षाही लांबत राहतो
आईच्या वात्सल्याचा लळा….!!
बायको बिमार पडली की,
बेजार असतो नवरोबा..
पारसे अन उकीरडा
यांचा होतो घरोबा….
अस्थाव्यस्थ घरामध्ये
चुलही देत राहते आळस
निपचीत्त धनीनीला बघून
सुकायला लागते तुळस…
म्हणून मांडवातली गाय
अन घरातली लेकरवाळी माय
सदा राहाव्यात देवा सुखी…
प्रपंच चालेल निटनेटका
घासं जातील आनंदाने मुखी..
✒️ दत्ता वंजे – नांदेड







Be First to Comment