शीर्षक – नागपंचमी
सण नागपंचमीचा
नागोबाला पूजु चला
साऱ्या माहेरवाशिणी
आल्या सर्वां भेटायाला..१
दूध,लाह्या,फुले घेऊ
नागोबाची करू पूजा
भाऊराया हाच माझा
नसे कुणी अन्य दुजा..२
झाडे,पशु,पक्षी यांना
श्रावणात देतो मान
जगी संस्कृती ही श्रेष्ठ
वाटे याचा अभिमान..३
श्रावणात रेलचेल
सण,उत्सवाचे दिन
पूजा करू मनोभावे
निसर्गाशी राहू लीन..४
मागू मागणे देवाला
नांदो सुख माहेरात
उंच,उंच घेऊ झोके
नाचू,गाऊ आनंदात..५
सुचित्रा कुंचमवार
नवी मुंबई
भ्रमणध्वनी 9820452427
Be First to Comment