Press "Enter" to skip to content

मुंबईत भव्य काव्यस्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्रातील नवोदित कवी कवयित्रींना सुवर्णसंधी !

सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆

मराठी साहित्य, कला विकास मंच ,मुंबई व आदर्श मुंबई पाक्षिकाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या तळागाळातील नवोदित तसेच गुणवंत कवी / कवयित्रींचे साहित्य महाराष्ट्रात सर्वदूर पसरून त्यांना न्याय व प्रसिध्दी मिळावी या विचार प्रणालीतून वरिल संस्थेमार्फत मुंबईत दि. २८ऑगस्ट २०२२ रोजी भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिक्षकांद्वारे निवडलेल्या काव्य रचनांना १ )प्रथम ( पुरस्कार – काव्य सम्राट – सम्राज्ञी ) ,रु. ५००१/-, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र, २)द्वितीय ( पुरस्कार : काव्य भूषण , रू. ३००१/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) , ३) (पुरस्कार काव्य “श्री ” रु. २००१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ), ४) (पुरस्कार ” काव्यरत्न ” रु / रु.१५०१/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र ) , ५) (पुरस्कार : ” काव्यदिप ” रु १००१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र )तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत.

सहभागी सर्व कवींच्या कविता “मनातलं” या काव्यसंग्रहात प्रकाशित केल्या जाईल व सर्व सहभागी कवींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र वितरण महाराष्ट्राचे प्रसिध्द कवी मान.अरूण म्हात्रे यांच्या हस्ते व व जेष्ठ साहित्यिक, अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.

तरी इच्छूक सर्व कवीं व कवयित्रीनी आपली काव्यरचना bhoirsanjay24@gmail.com वर मेल करा किंवा आयोजक : डॉ. संजय भोईर – वॉटस्अप क्र.९८१९१४५३५४ यावर दि. १ ऑगस्ट २०२२ पूर्वी पाठवण्याचे आवाहन संयोजक श्री. भालचंद्र पाटे , श्री अशोक भोईर व श्री.नवनाथ कांबळे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.