कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची भक्ती रचना- श्री विठ्ठल- रखुमाई !!
श्री विठ्ठल – रखुमाई !
टाळ-मृदुंगाचा गजर निनादला
वारकरी निघाले पंढरपूर यात्रेला
देवशयनी ‘आषाढी’ एकादशीला
‘विठ्ठल-रखुमाईच्या’ दर्शनाला…१.
आषाढाचे दिवस भर पावसाचे
त्यांना ना भय वादळ-वाऱ्याचे
उरी स्वप्न फक्त ‘माऊली’ भेटीचे
मुखी गीत-अभंग ‘बा’ विठ्ठलाचे…२.
भक्तीत असते सामर्थ्य ते महान
भक्ती पाहे विठू परीक्षा घेऊन
निस्वार्थी प्रामाणिक भक्तगणांस
आशीर्वाद मिळतो भर-भरून…३.
श्रद्धा-भक्ती वसे ज्या हृदयांतरी
तरे त्याची नौका जीवन-सागरात
आई-वडील-देवाचा हात ज्या डोई
त्यास यश-कीर्ती सर्वच क्षेत्रात…४.
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो.- 9987992519.
Be First to Comment