कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांच्या अस्सल आगरी बोली भाषेतील स्वरचित- “आगोठ” आगरी चारोळ्या !!
“आगोठ” आगरी चारोळ्या !!
१. मयना सुरू झालाय आगोठीचा
ईजा लखाकतीन, ढग गरारतीन
व्हईल ठोक पावसाला सुरवात
जसं काय ढोल-तासं वाजतीन !!
२. ऊनाचे गरमीन उच चरलेला पारा
आगोठिन हालू- हालू खली डेवल
त्यामुलं तरसलेले याकुल जिवाना
सुकाचा ठंडावा – गारवा मिलल !!
३. आगोठिन बलीराजा हाऊसतय
बईल-नांगर झ्येऊन शेतावं जातय
पोटा-पान्यासाटी, पान्या-पावसान
धरतरीचे कुशीन बि-बीयानं पेरतय !!
४. सुरू झाली हाय आथा आगोठ
पोरापुंन पातान पानी पराची वाट
वावल पानी, साचल जया-तया
सोरतीन कागदाची व्हरी- बोट !!
५. आगोठिन सुरवात… पानी पराची
किरपा हाय ती … राजा वरून’ची
नको मारु दरी……. नको हानू पूर
राजा तुला ईनंती.. कवी आरून’ची !!
आगरी कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. जासई – उरण. मो.९९८७९९२५१९.
Be First to Comment