विधवा नारीस समाजात सर्व ठिकाणी समानतेची वागवणूक मिळावी. या ‘समाज-प्रबोधनात्मक’ आशयाची कविश्री – अरुण द. म्हात्रे यांची स्वरचित कविता…
विधवेस द्या मानसन्मान !!
पती निधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला
आभूषणे पती नावाची; घालू द्या ना तिला-
पती निधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला ||
पती निधनानंतर स्त्रीच्या; बांगड्या फोडती
पुसुनी कुंकू, मंगळसूत्र; गळ्यातील काढती
बंदी रंगीत वस्त्रे घालण्यां; फुले माळण्याला-
पती निधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला..१.
पती जाता दुःखाचे डोंगर; कोसळे आकाश
आभूषणे उतरता अबला; दिसे ती भकास
कपाळ पांढरे, हात मुंडे; मुंडा तिचा गळा-
पतिनिधनानंतर विद्रुप; करू नये पत्नीला..२.
नेहमी सारखे मंगळसूत्र; असू द्या गळ्यात
बांगड्याही त्या विधवेच्या; राहू द्या हातात
माळू द्या फुले,लावू द्या कुंकू; तिने कपाळाला-
पतिनिधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला..३.
समाजात समानतेची; वागवणूक मिळावी
हळदीकुंकू – पूजाअर्चा; तिला करू द्यावी
शुभ कार्यात,सर्व ठिकाणी; द्यावा मान तिला-
पती निधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला..४.
देव नाही सांगत पाळण्यां; अनिष्ट प्रथांना
जनजागृती व्हावी वाटते; अरुण द. म्हात्रेंना
जाचक-अयोग्य प्रथा-बंधने; हवीत संपायला-
पती निधनानंतर विद्रूप; करू नये पत्नीला..५.
कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. जासई-उरण मो. 9987992519.
Be First to Comment