Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

कवयित्री सौ. मानसी म्हसकर- सुरत. यांची- “साद ऐकशील का…” ही स्वरचित कविता.

ऐक

तुझ्या सहवासात झेपावतो ,
माझ्या मनाचा झोका !
डौलणाऱ्या शब्दांचा अबोल ,
भाव तू वाचशील का !!
टाहो फोडणाऱ्या अंतरीची ,
साद तू ऐकशील का !!!

आठवणींच्या मैफिलीत ,
उमटले प्रीतीचे सूर !
तप्त काळजाचे तराणे ,
गझल म्हणुनी गाशील का !!
सांग सख्या अंतरीची ,
साद तू ऐकशील का !!!

स्पंदन होऊ पाहे एक ,
ओढ अनामिक लागली !
माझ्या श्वासांना तुझ्या ,
हृदयाचा पत्ता देशील का !!
सांग सख्या अंतरीची ,
साद तू ऐकशील का !!!

प्रितीचा पारवा घुमतो ,
गातो एकच गीत !
पण अधर माझे लाजरे ,
आवाज तू होशील का !!
सांग सख्या अंतरीची ,
साद तू ऐकशील का !!!

पापणीत विसावलास ,
रोमरोमात भिनलेला ,
बंद त्या डोळ्यांचा ,
आरसा होशील का !
सांग सख्या अंतरीची ,
साद तू ऐकशील का !!!

मी खळखळणारी सरिता ,
पैलतीरावर तुझे गाव !
उधाणलेल्या भावनांचा ,
किनारा तू होशील का !!
सांग सख्या अंतरीची ,
हाक तू ऐकशील का !!!

…सौ मानसी म्हसकर सुरत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.