DPW मध्ये पुन्हा एकदा कामगारनेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाचा झेंडा
सिटी बेल ∆ उरण ∆
चमकणारे सगळेच सोने असते असे नाही याचा प्रत्यय न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (DPW) JNPT मधील ऑपरेटर्स कामगारांना आला. बऱ्याच नेत्यांनी या कामगारांचे नेतृत्व केले परंतु कामगार नेते महेंद्र घरत यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलेल्या DPW मधील कामगारांना त्यांनी महेंद्र घरत यांचे नेतृत्व सोडल्यापासून व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक मिळायला लागली होती.
कंपनीच्या सुरवाती पासूनच कामगारांना बारा तास काम करावे लागत असे तसेच फक्त स्टाफला ५ दिवसांचा आठवडा होता. कामगारांनी २००१ साली कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारल्यावर महेंद्र घरत यांनी व्यवस्थापनाला दणका देत कामाचे तास १२ वरून आठ तास केले तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा केला.थोड्याच दिवसांत चांगली पगारवाढ व इंसेन्टीववाढीचा करार करण्यात आला. हे सगळ महेंद्र घरत यांनी मिळवून दिल्यामुळे कामगार प्रतिनिधींच्या डोक्यात हवा गेली तसेच काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्यासमोर महेंद्र घरत यांच्या रूपाने तगडे आव्हान निर्माण होत असल्याची जाणीव होऊन राजकीय आकसापोटी महेंद्र घरत यांच्या विरोधात कामगार प्रतिनिधींचे कान भरले व गैरसमज निर्माण केले.
जेथे कामगारांचा विश्वास नाही तेथे आपल्याला नेतृत्व करायचे नाही म्हणून महेंद्र घरत यांनी २०१२ साली त्यांचे नेतृत्व सोडून दिले. परंतु १० वर्षांच्या काळात कामगारांना विश्वासात न घेता इतर संघटनांनी पगारवाढीचे करार केले.मागच्या इंसेन्टीवपेक्षा कमी इंसेन्टीवचा करार करण्यात आला. त्यामुळे कामगारांना कामगार नेते महेंद्र घरत यांची उणीव भासू लागली.
याच दहा वर्षात कामगार नेते महेंद्र घरत यांनी INTUC च्या राष्ट्रीय सचिव पदी तर ITF लंडन या बहुराष्ट्रीय संघाचे व्हाईस चेअरमन म्हणून BMCT, GTI, MEARKS, JNPTमधील कामगारांना ITF च्या माध्यमातून न्याय मिळवून देऊन कामगारांच्या मनावर अधिराज्य केले व ते कामगारांसाठी मसीहा बनले. हि बाब DPW मधील कामगारांना लक्षात येऊन आता आपल्याला कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली व पुन्हा एकदा त्यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले.
दिनांक २० मे २०२२ रोजी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी श्री. पी. के. रामण, श्री. वैभव पाटील, श्री. किरीट पाटील संजय ठाकूर, आनंद ठाकूर, विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, कॉंग्रेस नेते राम भगत, राम पाटील, कमलाकर घरत, भालचंद्र घरत, सदानंद पाटील, नरेश ठाकूर, हेमंत ठाकूर, श्रेयस घरत, आदिनाथ भोईर, संघटनेचे संघटक विवेक म्हात्रे, अरुण पाटील, शमिम अन्सारी, स्वप्नील ठाकूर तसेचDPW चे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment