Press "Enter" to skip to content

गणेश बंझोप्लास्ट कंपनीत
मॉक ड्रिल चा थरार

सिटी बेल ∆ उरण ∆

गणेश बंझोप्लास्ट लिमिटेड (जी. बी एल),बल्क टर्मिनल, जे एन पी टी, न्हावा शेवा येथील कामगारांना नुकताच मॉक ड्रिल चार थरार अनुभवायला मिळाला.

“The Manufacturer Storage and Import of Hazardous Chemical Rule 1989” च्या नियम १४ मधील तरतुदी अन्वये कारखान्यांमध्ये प्रति वर्षी बाह्य आपत्कालीन आराखड्याची सराव चाचणी (Rehearsal ) घेणे बंधन कारक आहे. सदर तरतुदी अन्वये गणेश बंझोप्लास्ट लिमिटेड, बल्क टर्मिनल, जे एन पी टी या ठिकाणी बाह्य आपत्कालीन आराखड्याची पूर्वनियोजित कवायत घेण्यात आली होती.

सदर कवायतीचे वेळी कारखान्यातील लोडींग ग्यांट्री मध्ये मिथेनोल टँकर मधील रसायन सांडल्यामुळे (Spillage) लागलेल्या आगीमध्ये एक कामगार अडकल्याची रूपरेषा नियोजित करण्यात आली होती.

अशा प्रकारच्या कवायती आयोजित करण्यामागेआपत्कालीन परिस्थितीत कारखान्यातील कामगारांची असलेली पूर्व तयारी व आग विझवतेवेळी कारखान्यात असलेली उपकरणे सुस्थितीत असल्याबाबत तसेच शासकीय संस्थांचा प्रतिसाद कालावधी पाहणे हा प्रमुख उद्देश असून, अश्या वेळी कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना “प्री ब्रिफिंग तसेच पोस्ट ब्रिफ्रिंग” करण्यात येते.

प्रत्यक्ष कवायतेचे वेळी जे एन पि टी फायर सर्व्हिस, पोलीस, मेडिकल सर्व्हिस, मार्ग ग्रुप चे सर्व मेंबर्स यांनी तातडीने प्रतिसाद दिला. सदर मॉक ड्रिल चे सर्वत्र कौतुक होत असून दिपक फर्टीलायझर सारख्या शेजारील कंपनी ने आम्ही सुरक्षित असल्याचं मत प्रदर्शित केलं आहे.

सदर कवायत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच तहसीलदार यांच्या सल्यानुसर व कंपनीचे श्री श्याम निहाते, श्री आशुतोष पाटील, श्री सचिन सस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून या मध्ये श्री संजय सक्सेना, जे एन पि टी. यांनी परीक्षक म्हणून काम केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.