उरणमध्ये होणार स्वतंत्र कोरोना (DCH) हॉस्पिटल
सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / उर
ण #
गेल्या पाच महिन्यांपासून उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत उरण तालुक्यात १००० कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. त्यापैकी ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. यामध्ये मुख्यता वयस्कर आजारी व्यक्ती असतात. कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. व ती व्यवस्था उरणमध्ये उपलब्ध नसल्यामुळे नवी मुंबई येथे जावे लागते. त्यावर खर्चही भरपूर होतो. हा खर्च सामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे उरणमध्ये स्वतंत्र कोविड हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे. ते उभारण्यासाठी अतिशय महत्वाची बैठक जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये पार पडली.
यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईहून जेष्ठ आयसीयू तज्ञ डॉ. प्रफुल्ल सामंत आले होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील मीरा-भाईंदर येथे ३०० बेडचे स्वतंत्र हॉस्पिटल उभारलेले आहे. या बैठकीमध्ये (Dedicated Covid Hospital) उभारणीसाठी सविस्तर चर्चा होऊन एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये लागणाऱ्या सर्व सुखसोयी, साहित्य उदाहरणार्थ, वेंटिलेटर मशीन, तज्ञ डॉक्टर, नर्सेस व वैद्यकीय मनुष्यबळ यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद आदी बाबींवर निर्णय घेण्यात आलेले आहेत.
सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चेअरमन जेएनपीटी यांना लवकरात लवकर पाठविण्याचे ठरलेलेआहे. जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. राज हिंगोरानी यांच्या दालनात झालेल्या बैठकीला उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील, दिनेश पाटील उरण मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विकास मोरे, डॉ. सुरेश पाटील, डॉ.ठाकरे, जेएनपीटी हॉस्पिटलचे डॉ. राठोड, डॉ. केळकर व समर्पित समाजसेवक कोविड नोडल ऑफिसर संतोष पवार हे उपस्थित होते.
या महत्त्वाच्या बैठकीमुळे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल निर्मितीला मूर्त स्वरूप आलेले आहे. यामध्ये Uran Medical Association ने चांगला पुढाकार घेतलेला आहे. जिथे इच्छाशक्ती असते, तिथे मार्ग सापडतो. (Where there is a will there is a way.} त्यामुळे व्हेंटिलेटर अभावी उरणकरांचे जाणारे प्राण वाचतील. अशी अपेक्षा आ
हे.
कॉम्रेड भुषण पाटील
कामगार नेते
व प्रस्तावित विश्वस्त.
Be First to Comment