दिशा महिला मंच चा उपक्रम : एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा
सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन #
देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती नागरिकांना कळायला हवी. नागरिकांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी ‘एक धागा शौर्याचा’ ‘एक धागा रक्षणाचा’ हा उपक्रम राबवून चार दिवसांपासून तळोजा येथील दिशा महिला मंच व्यासपीठातील महिलांनी 1000 राख्या तयार केल्या. महिलांनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
महिलांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून नागरिकांनाही मिळेल.सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितही देशवासियांना मदत करतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निलम आंधळे यांनी व्यासपीठाअंतर्गत हा उपक्रम घेतला.
राख्या तयार करण्यासाठी व मदतकार्यासाठी विद्या मोहिते , रेखा ठाकूर , ख़ुशी सावर्डेकर,अनुप्रिता महाले,गीतांजली नायकोडी,भावना सरदेसाई, रीना पवाँर, दिपाली कपोते,सुरेखा आडे,शालू पांडे,अनुजा मस्के,सुवर्णा टेंगळे,अर्चना मसने,रोशनी ओरपे,उज्वला शिंदे, कविता पाखरे,शिल्पा चौधरी,श्रुती शिंदे,विभावरी शिगवण,जयश्री झा,प्रमिला झिंजाड,स्वप्नाली दोशी,वैशाली जुमडे, मनिषा शिंदे,सारिका माळी, सत्या काळे, विद्या वायकर,रुपाली होडगे या महिलांनी सहकार्य केले.
Be First to Comment