कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची राम नवमी निमित्त स्वरचित कविता- जय श्रीराम !
जय श्रीराम !
प्रभू रामचंद्र आयोध्येत तू जन्मताच
आयोध्या-वासी हर्षोल्ल्हासीत झाला
बातमी जन्माची वायुवेगे पसरताच
कानी स्वर गुंजले- राम जन्मला… १.
पाळलास शब्द माता-पित्याचा
माता-कौसल्या, पिता-दशरथाचा
भोगलास वनवास चौदा वर्षांचा
राम तू एक वचनी एक पत्नी चा… २.
दिसताच अन्यायी, राक्षसी प्रवृत्ती
प्रत्यंचा ताणून सोडलास बाण
नेम चुकणे कधीच शक्य नव्हते
‘धनुर्विद्ये’ चे तुज अलौकिक ज्ञान… ३.
श्रद्धा तुजवरी भरत-लक्ष्मणाची
सेवाभक्ती पवनपुत्र हनुमंताची
सोबत- पतिव्रता पत्नी सीतेची
प्रजेस आवड भारी राजारामाची… ४.
संयमी निश्चयी तू मर्यादा पुरुषोत्तम
न्यायनिष्ठ दयावंत कृपाळू प्रजेचा
कर जोडूनी करूया प्रभुस प्रणाम
करूया जय जय कार श्रीरामाचा… ५.
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.









Be First to Comment