Press "Enter" to skip to content

प्रमोद भिंगारकर यांचे भव्य आयोजन

५९ वी “महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न

सिटी बेल • पनवेल • क्रिडा प्रतिनिधी •

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस असोसिएशन – रायगड इंडीयन बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस फेडरेशन (मान्यताप्राप्त) महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन / महाराष्ट्र क्रिडा परिषद, महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी, विचुंबे-पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ वी “महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच ८ वी वुमेन फिजीक, ५ वी मेन फिजीक आणि २ री क्लासिक बॉडी बिल्डींग स्पर्धा पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे रायगड जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष तथा विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांनी आयोजित केली होती.

या स्पर्धेत मेन्स बॅाडीब्ल्डींग किताब विजेता अक्षय मोगरकर (मुंबई), वुमेंन्स बॅाडीबिल्डींग किताब विजेती हर्षदा पवार (मुंबई), मेंन्स क्लासिक बॅाडीबिल्डींग किताब विजेता- ऊदय देवरे (रायगड), मेंन्स फिजिक्स किताब विजेता गिरीश पाटील (रायगड), वुमेंन्स बिकीनी किताब विजेती श्रद्धा आनंद (मुंबई), टीम चॅंम्पीयन शिप प्रथम क्रमांक १४० गुण (रायगड), द्वीतीय क्रमांक ११८ गुण (मुंबई),
त्रृतीय क्रमांक ८५ गुण (पुणे) यांनी बाजी मारली.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार तथा उत्तर रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते आशियाई बॅाडीबिल्डींग चे सेक्रेटरी डॉ. संजय मोरे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे, भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, असोसिएशनचे आयोजक सचिव दिनेश शेळके, रायगड कार्याध्यक्ष मारुती आडकर,विचुंबे गावकमीटीचे अध्यक्ष के.सी.पाटील विचुंबे, नगरसेवक विकास घरत, अरूणकुमार भगत, तेजस कांडपीळे, हरेश केणी, जि.प.सदस्य अमित जाधव, पं.स.सदस्य भुपेंद्र पाटील, सुकापुर ग्रा.पं.सरपंच योगीता राजेश पाटील, गोल्डन ग्रुपचे निलकंठ भगत, आशुतोष पाटील,अमोल गोवारी, विजय पवार, राजेश पाटील, प्रमोद भगत, आलुराम केणी, दीवेश भगत ऊपसरपंच सुकापुर, उसर्ली चे माजी सरपंच विश्वास भगत, प.ता.भा.ज.पा.युवा उपाध्यक्ष आनंद ढवळे, मा.नगरसेवक रवी नाईक, ग्रा.पं.सदस्य रवींद्र भोईर, किशोर सुरते, नितीन भोईर, बळीराम पाटील मा.सरपंच विचुंबे, आकाश पाटील सरपंच विचुंबे, अनिल भोईर, जगदीश भोईर, आनंता गायकवाड, विवेक भोईर, शाम पाटील, सतीश म्हात्रे, नयन भोईर, डी.के.भोईर, अर्जुन सुरते, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, चेतन भिंगारकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.