लवकरच बैठक लावण्याचे कंपनी प्रशासनातर्फे आश्वासन
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
CWC – हिंद टर्मिनल कंपनी भेंडखळ ता. उरण या कंपनीने आज तागायत करोडो रूपयाचा नफा कमविला. या हिंद कंपनीचा 30/04/2022 रोजी काम संपुष्ठात येणार असुन त्यामुळे सुमारे 600 कामगारांच्या नोकरीचा व पुढील भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
कंपनीने कामगारांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर देणी, नुकसान भरपाई व नोकरीची हमी न देता कंपनीतील कलमार मशीन व इतर सामग्री बाहेर काढत होती. त्याचा कामगार व युनियनने जोरदार विरोध केला. व पुन्हा तसे केल्यास तिव्र आंदोलन केले जाईल चा ईशारा दिला.
अद्यापही कंपनीने कामगारांना देणी व नुकसान भरपाई संदर्भात हमी दिलेली नाही व युनियनला विश्वासात घेतलेले नाही. ‘कंपनीने युनियन सोबत चर्चा केली आहे’ अशी पोलिसांना खोटी माहिती देवून पोलीसांच्या प्रोटेक्शनमध्ये दि. 26/03/2022 रोजी पुन्हा हिंद कंपनी कलमार मशीन बाहेर काढून सर्वांची फसवणुक करून कामगारांवर अन्याय करत होती.
सदर आन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 26/3/2022 रोजी सकाळी 10 वाजता हिंद कंपनी येथे कामगार नेते, विविध संघटनेचे नेते, कामगार युनियन, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कंपनीने युनियन सोबत चर्चा केली आहे’ अशी पोलिसांना खोटी माहिती देवून पोलीसांच्या प्रोटेक्शनमध्ये आज दि. 26/03/2022 रोजी पुन्हा हिंद कंपनी कलमार मशीन बाहेर काढत होती. यावेळी याला कामगार वर्गानी जोरदार विरोध केला. कामगार व युनियन च्या ताकदीला कंपनीला झुकावे लागले. कामगारांनी मशीन पुन्हा बाहेर जाऊ दिले नाही. तशी स्पष्ट व ठाम भूमिका कामगार वर्ग, युनियनने घेतल्याने तसेच इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत,राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ चे राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, रायगड श्रमीक संघटनेचे भुषण पाटील, छत्रपती क्रांती सेनेचे तालुका संरक्षक विनोद ठाकूर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कपंनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सोमवार नंतर तिन्ही युनियन सोबत एकत्र बैठक घेऊन कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.असे कामगारांना कळविले.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनीही मध्यस्थी केल्याने कामगार व कंपनी प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील अशी माहिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.













Be First to Comment