कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची जागतिक कविता दिनानिमित्त स्वरचित कविता
कविता… कवितेची !!
सुखात आनंदी असते कविता
दुःखात उदास भासते कविता
जीवनाची अनेक रूपे दावण्यां
स्वच्छ ‘आरसा’ बनते कविता..१.
आई – ताईच्या मायेची कविता
पिता-भाऊच्या छायेची कविता
नाती – गोती समजावून सांगते
घडते आणि घडविते कविता..२.
लाजते-बावरते-बहरते कविता
प्रीत-झुल्यावर झुलते कविता
इंद्रधनूत, चांदण्यात मिसळते
सुगंध-सौंदर्यात न्हाते कविता..३.
प्रतिभेचे ‘मूर्त-स्वरूप’ कविता
कल्पना-सत्त्यात वावरते कविता
जे सूर्यदेवही पाहू शकत नाही
‘ते’ सहजतेने पाहते कविता..४.
कवी कवयित्रींचा ‘ध्यास’ कविता
धरती – अंबराचा ‘श्वास’ कविता
रसिक-वाचकांचा ‘विश्वास’ कविता
अशी सर्वांगसुंदर ‘झकास’ कविता…
अशी सर्वांगसुंदर ‘झकास’ कविता..५.
कवी- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई,मो.9987992519.
Be First to Comment