Press "Enter" to skip to content

सर्व पक्षिय समितीचे आंदोलन

हिंद टर्मिनलच्या कामगारांना न्याय मिळवून देणार – कामगार नेते महेंद्र घरत

सिटी बेल • उरण •

भेंडखळ उरण येथील हिंद टर्मिनल प्रा. लि. या कंपनीने १५ वर्षापूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर प्रकल्प उभा करून करोडोंचा नफा कमविला व आता ३० एप्रिल २०२२ नंतर कंपनी बंद करत आहोत अशी नोटीस कामगारांना व संघटनेला दिली गेली.

जमिनी गेल्यामुळे कंपनीशिवाय रोजगार उरलेला नाही. त्यामुळे ६०० कामगारांचे व त्यावर अवलंबून किमान ५००० स्थानिकांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड पडणार असे दिसते आहे. त्यातच कंपनीकडून कोणताही ठोस निर्णय कामगारांना दिला जात नाही उलट कंपनीतील मशीनरी हलविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी दिनांक १८ मार्च २०२२ रोजी सर्व पक्षिय समितीच्या माध्यमातून कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी कामगारांना संबोधित करताना NMGKS संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले की, कामगारांच्या हक्काची कायदेशीर देणी तसेच नुकसान भरपाई दिल्याशिवाय एकही मशीनरी बाहेर जाऊ देणार नाही. जर व्यवस्थापनाने बऱ्याबोलाने दिली नाही तर व्यवस्थापनाच्या छाताडावर बसून वसूल करू व कामगारांना न्याय मिळवून देवू असे ते म्हणाले.         

या आंदोलनासाठी NMGKS संघटनेचे विनोद म्हात्रे, पी. के. रामण,  वैभव पाटील, किरीट पाटील, लंकेश ठाकूर, रवींद्र पाटील, प्रांजल भोईर, मूळनिवासी संघटनेचे संजय घरत, गणेश पाटील, सिटूचे मधुसूदन म्हात्रे, गावकमिटीचे रमेश ठाकूर, उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या सौ. संध्या ठाकूर, सौ. योगिता ठाकूर, सौ. स्वाती घरत, कृष्णा ठाकूर भेंडखळ ग्रामस्थ व शेकडोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.