गणेशोत्सवासाठी चाकरमानी 20 दिवस आधीच कोकणात दाखल होणार
सिटी बेल लाइव्ह / रायगड / धम्मशिल सावंत #
कोकणातील सर्वात महत्वपूर्ण सण असा गणेशोउत्सव २२ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्व भूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकरी रायगड यांनी नियमावली जाहीर केली आहे. तसेच यावर्षीचा गणेशोत्सव शासन नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
तर गणेशोउत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांनी 14 दिवस कॉरन्टाईन देखील होयचे आहे. मात्र २० दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आता पासूनच धाव घेतली असल्याने कशेडी बंगला घाटात वाहनांच्या पासची तपासणी करून कोकणात वाहने सोडण्यात येत आहेत. परिणामी कशेडी बंगला येथे वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीचे चित्र पहावयास मिळत आहे.
Be First to Comment