मढवी गुरुजी यांचा वाढदिवस समाज उपयोगी वस्तू वाटप करून साजरा
सिटी बेल • उलवे •
मोहन का मढवी गुरुजी यांचा वाढदिवस समाज उपयोगी वस्तू वाटप करून त्याचप्रमाणे आनंदवन चिरनेर साठी 500 झाडे देऊन श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने साजरा केला गेला.
सर्वांच्या परिचयाचे माननीय मढवी गुरुजी यांचा वाढदिवस सेक्टर 20 गणेश मित्र मंडळ उलवे यांच्या माध्यमातून वाचनालयासाठी पुस्तके वाटप त्याच प्रमाणे आनंदवन चिरनेर साठी 500 साडे अर्पण करून वटवृक्ष सामाजिक विकास मंडळ उलवे याचे अध्यक्ष किरण मढवी यांच्या माध्यमातून माळी यांना सुपूर्त करण्यात आली.

याप्रसंगी त्यांचे ज्येष्ठ नागरिक सहकारी त्याचप्रमाणे साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील,रोटरी क्लब उलवे नोड चे प्रेसिडेंट शिरीष कडू,एक नामवंत कलाकार सचिन आवटे, उलवे सेना चे पदाधिकारी शेखर काशीद किरण मढवी, संदेश साळुंके त्याच प्रमाणे श्री गणेश मित्र मंडळ सेक्टर 20 चे पदाधिकारी व सदस्य सर्व सामील होते याप्रसंगी मोहन फुंडे नामवंत गायक यांनी कराओके गायन करून लोकांची मने जिंकली.

Be First to Comment